मेट्रोचा स्लॅब कोसळून भीषण दुर्घटना, रिक्षाचा चक्काचूर, ४ गंभीर
मेट्रोचा स्लॅब कोसळून भीषण दुर्घटना, रिक्षाचा चक्काचूर, ४ गंभीर
img
वैष्णवी सांगळे
मुंबईतील मेट्रो प्रकल्पाच्या कामादरम्यान सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुलुंड (पश्चिम) येथील एलबीएस रोडवर मेट्रो पिलरचा सिमेंटचा एक मोठा भाग चालत्या रिक्षावर कोसळल्याने ३ ते ४ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर दुर्घटनेत रिक्षा चक्काचूर  झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुलूंडमध्ये  जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ मेट्रोचे बांधकाम सुरू असताना पिलरचा एक हिस्सा अचानक निखळला आणि थेट खाली जाणाऱ्या धावत्या रिक्षावर पडला. शनिवारी (१४ फेब्रुवारी) दुपारी १२:२० च्या सुमारास घडली. ही दुर्घटना इतकी भीषण होती की  रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. या भीषण अपघातात रिक्षातील ३ ते ४ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल (MFB), स्थानिक पोलीस, मेट्रो कर्मचारी आणि पालिकेच्या विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ​जखमींना तातडीने १०८ रुग्णवाहिकेमार्फत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, या दुर्घटनेमुळे एलबीएस रोडवरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, मेट्रो प्रशासनाकडून सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
mumbai |
इतर बातम्या
Join Whatsapp Group