दैनिक भ्रमर : एका १५ वर्षाच्या तरुणीचे एका 22 वर्षाच्या तरुणा सोबत अनैतिक संबंध होते. या संबंधातून ती गर्भवती राहीली होती. त्यानंतर त्या मुलीने एका मुलीला जन्मही दिला. त्यानंतर जन्माला घातल्या घातल्या त्या मुलीला कचऱ्याच्या डब्ब्यात फेकून देण्यात आलं. ही धक्कादायक घटना कल्याणच्या बारावे परिसरात घडली. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी नवजात मुलीला फेकणाऱ्या आरोपीला शोधून काढले आहे.
नेमकं काय घडलं ?
ही धक्कादायक घटना आहे कल्याण पश्चिमेकडील बारावे परिसरातील. दोन दिवसांपूर्वी सकाळच्या सुमारास कचराकुंडीलगत कचऱ्यातून लहान बाळाचा रडण्याचा आवाज स्थानिकांना आला. यानंतर स्थानिकांना एका गोणीत एका दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक असल्याचे आढळले. याबाबत स्थानिकांनी खडकपाडा पोलिसांना माहिती दिली.
हे ही वाचा...
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बाळाला बालसंगोपन केंद्रात पाठवले आणि बाळाला कचऱ्यात फेकणाऱ्या आईवडिलांचा शोध सुरु केला. सीसीटीव्ही फुटेज तसेच परिसरात चौकशी केल्यानंतर समोर आलेले सत्य पाहून पोलिसांनाच धक्का बसला. या बाळाला एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने जन्म दिल्याचे पोलिसांना तपासात समजले.
हे ही वाचा...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसरा, ही अल्पवयीन मुलगी घरात एकटीच राहते. ती अनाथ असून तिचे आजी-आजोबा गावी राहतात. मुलगी घरी एकटी असल्याची फायदा घेत आरोपीने तरुणीशी मैत्री वाढवली. त्यांच्या प्रेमसंबंधातून मुलगी गर्भवती राहिली. गर्भवती राहताच नऊ महिने तिला घराबाहेर पडण्यास मज्जाव केला. बाळाला जन्म दिल्यानंतर ते बाळ आरोपीने कचराकुंडीत फेकले. यानंतर आरोपी फरार झाला. पोलिसांनी या घटनेचा छडा लावत आरोपीला टिटवाळा परिसरातून अटक केली.