मी गेल्यावर बायकोचं कसं होईल ? भीतीतून इस्रोच्या माजी कर्मचाऱ्याचं भयानक कृत्य
मी गेल्यावर बायकोचं कसं होईल ? भीतीतून इस्रोच्या माजी कर्मचाऱ्याचं भयानक कृत्य
img
वैष्णवी सांगळे
कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपण गेल्यानंतर आपल्या बायकोचे काय होईल? ती कशी राहील या तणावाखाली नवऱ्याने बायकोचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) एका निवृत्त कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केली. ६५ वर्षीय नागेश्वर राव असे या आरोपीचे नाव आहे. नागेश्वर हा बेंगळुरूच्या बोम्मेहल्ली परिसरातील व्हर्चुओसो अपार्टमेंटमध्ये राहत होता. 

प्राथमिक माहितीनुसार, ६५ वर्षीय नागेश्वर राव मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता. नागेश्वरने त्यांची पत्नी संध्याश्री हिची टॉवेलने गळा दाबून हत्या केली. पोलिस तपासात असे दिसून आले आहे की राव यांना मानसिक आजार होता आणि ते आत्महत्या करण्याचा विचार करत होते. हे पाऊल उचलण्यापूर्वी त्यांनी पत्नीला मारण्याचा निर्णय घेतला होता.

या धक्कादायक कृत्यामागे कोणतेही मोठे घरगुती वाद किंवा कोणीच कारणीभूत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि अधिक माहिती मिळवत आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group