भयंकर ! घरात पूजा सुरू असताना  गोळीबार, पत्नीसह 2 पुजाऱ्यांची हत्या; अखेर आरोपीचा एन्काऊंटर
भयंकर ! घरात पूजा सुरू असताना गोळीबार, पत्नीसह 2 पुजाऱ्यांची हत्या; अखेर आरोपीचा एन्काऊंटर
img
Nandini khandare More
गुन्हे गारीच्या घटनांमधये सातत्याने वाढ होत असून आता ही बाब अधिकच गंभीर होत चालली आहे.दरम्यान आता उत्तर प्रदेशात एक अत्यंत भयन्कर आणि विचित्र घटना घडली आहे. 

उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यात  थरकाप उडवणारी घटना घडलीय आहे. अहरौला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंभुपूर गावात एका व्यक्तीने आपल्या पत्नीसह दोन पुजाऱ्यांची निर्घृण हत्या केली आहे. त्याने तिघांना बंदुकीतून गोळ्या घातल्या आहेत. या घटनेनंतर आरोपीनं स्वतःच्याच लहान मुलांना घरात ओलीस ठेवलं होतं. त्याने तब्बल सात तास मुलांना अशाप्रकारे डांबून ठेवलं. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी अरविंद सिंग याचं एन्काऊंटर केलं आहे. मंगळवारी रात्री उशिरा सुरू असलेला हा थरार बुधवारी संपला.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अरविंद सिंग याच्या भावाची (गुड्डू सिंग) आठ वर्षांपूर्वी हत्या झाली होती. गुड्डू सिंग याचे भूत बनून तो कुटुंबाला त्रास देत असल्याचा भास आरोपी आणि त्याच्या कुटुंबाला होत होता. या भूतबाधा आणि करणीपासून सुटका मिळवण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून अरविंदच्या घरात तंत्र-मंत्र आणि विशेष पूजा-पाठ सुरू होता.

 प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी अरविंद सिंग यांच्या घरी पूजा सुरू होती. त्यावेळी चार पुजारी, अरविंद यांची पत्नी बबिता, एक मुलगा आणि एक मुलगी उपस्थित होते. अरविंद संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास बाजारातून घरी आला. घरात पूजा सुरू असल्याचे पाहून त्यांनी पुजाऱ्यांना विचारले काय सुरू आहे? पुजाऱ्यांनी त्यांना सांगितले की पूजा सुरू आहे. त्यानंतर अरविंदने पुजाऱ्यांकडे त्यांचे आधार कार्ड मागितले. या मागणीवरून अरविंद आणि पुजाऱ्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर अरविंदने घरात ठेवलेली बंदूक काढून गोळीबार केला. या गोळ्यांमध्ये त्याची पत्नी बबिता, पंडित महेंद्र पाठक आणि आणखी एक पंडित जखमी झाले. या तिघांचाही अधिक रक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू झाला. तिघांच्या हत्येनंतर आरोपी आपल्या ३ मुलांसह घरामध्ये बसून होता. 

मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी मध्यरात्री आरोपीला बाहेर येण्यास सांगितले. आरोपीने पोलिसांचे ऐकले नाही. त्याने पोलिसांवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीचा एन्काऊंटर केला. आरोपी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये आरोपीच्या चार वर्षांच्या मुलाचा गोळी लागून त्याचा मृत्यू झाला. तर एका मुलीच्या हाताला गोळी लागली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी, त्याची बायको, दोन पुजारी आणि एका मुलगा असे पाच जणांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. तर जखमी मुलीला उपचारासाठी दाखल केले. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group