Zepto-Blinkitसह 105 दुकानं FDAच्या रडारवर; तुकाराम मुंढेंची मोठी ॲक्शन!
Zepto-Blinkitसह 105 दुकानं FDAच्या रडारवर; तुकाराम मुंढेंची मोठी ॲक्शन!
img
Nandini khandare More

दिवाळीच्या सणानिमित्त बाजारपेठांमध्ये खरेदीची मोठी लगबग सुरू असतानाच अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केली आहे. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली Zepto आणि Blinkit यांसारख्या ऑनलाइन डिलिव्हरी प्लॅटफॉर्मसह तब्बल 105 दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. FDAच्या या कारवाईमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली असून, नेमकी कोणती अनियमितता आढळली आणि प्रशासनाने काय कारवाई केली? जाणून घेऊया सविस्तर.

अन्न व औषध प्रशासनाच्या विभागाने राज्यभरात विशेष मोहीम राबवली. विभागाने कारवाईचा धडाका लावत शंभरहून अधिक दुकानांचे परवाने निलंबित केले. यावेळी त्यांनी अनेक बड्या ब्रँडवर कारवाई केली. यात काही क्विक कॉमर्स कंपन्यांचा देखील समावेश आहे.  तुकाराम मुंढे यांच्या या कारवाईची राज्यभरात चर्चा होत आहे. एफडीएने  चार आणि पाच नोव्हेंबर रोजी विशेष मोहीम राबवली होती. यावेळी मुंबईतील 28  दुकानांवर कारवाई केली. यात क्विक कॉमर्स फ्लॅटफॉर्म झेपटो आणि ब्लिकिंटवर देखील कारवाई करण्यात आली. विभागाने पुणे, अमरावती, मुंबई, कोकण अशा विविध जिल्ह्यात कारवाई केली. मुंबईच्या बोरिवली येथील बिर्याणी सेंटरवर देखील नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.

भंडाऱ्यातही अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

भंडारा जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली. तब्बल 8 लाख 59 हजारांचा प्रतिबंधीत अन्नसाठा जप्त केला.  नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 9 दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले. तर 68 पेढ्यांच्या दुकानांना नोटीसा मिळाल्या.  अन्नामध्ये भेसळ करणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई केली. 44 पेढ्यांच्या दुकानांना सुमारे ३ लाखांचा दंड ठोठावण्यात आला.


इतर बातम्या
Join Whatsapp Group