रेल्वे रुळांवर मोठा थरार! इंजिन सोडून ७ डबे धावले, अपघाताने खळबळ
रेल्वे रुळांवर मोठा थरार! इंजिन सोडून ७ डबे धावले, अपघाताने खळबळ
img
Nandini khandare More
रेल्वे  अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धावत्या रेल्वेचे इंजिन आणि सात डबे वेगळे झाल्याने मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे, इंजिनपासून वेगळे झालेले हे सात डबे तब्बल ६ किलोमीटरपर्यंत धावत राहिले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

तामिळनाडूतील तिरुपत्तूर जिल्ह्यात ही विचित्र रेल्वे घटना घडली आहे. जोलारपेट्टई रेल्वे स्थानकाच्या यार्डमध्ये उभी असलेली मालगाडी अचानक इंजिनशिवाय पुढे जाऊ लागली. या मालगाडीचे सात रिकामे डब्बे तब्बल सहा किलोमीटरपर्यंत गेले. विशेष म्हणजे, या डब्यांना कोणतेही इंजिन जोडलेले नव्हते. तरीही हे डबे रेल्वे रुळांवरून पुढे सरकत मुख्य रेल्वे मार्गावर पोहोचले. त्यानंतर हे सातही डब्बे रुळांवरून घसरले. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाची धावपळ उडाली. 

या अपघाताचा परिणाम बंगळुरू-चेन्नई रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर झाला. काही रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. त्यामुळे प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रुळांवरून घसरलेले डब्बे बाजूला करण्याचे आणि रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्याचे काम हाती घेण्यात आले. मालगाडीचे डब्बे इंजिनशिवाय इतके अंतर कसे गेले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group