दिवाळीआधी तांदळाच्या दरात मोठी वाढ?  किलोमागे किती रुपयांनी महागला तांदूळ? सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
दिवाळीआधी तांदळाच्या दरात मोठी वाढ? किलोमागे किती रुपयांनी महागला तांदूळ? सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
img
Nandini khandare More
दिवाळीचा सण जवळ आला असतानाच सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. रोजच्या जेवणात महत्त्वाचे स्थान असलेल्या तांदळाच्या दरात वाढ झाल्याची चर्चा असून, यामुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडू शकते. आधीच भाजीपाला, खाद्यतेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमुळे नागरिक त्रस्त असताना तांदळाच्या दरवाढीचा परिणाम ग्राहकांवर होऊ शकतो. नेमका कोणत्या प्रकारचा तांदूळ किती रुपयांनी महागला आणि सध्याचे बाजारभाव काय आहेत? जाणून घ्या सविस्तर माहिती.

महाराष्ट्रात सध्या दुष्काळ आणि कमी पावसामुळे शेती उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे, ज्याचा थेट फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला आहे. दिवाळी तोंडावर असताना तांदळाचे दर प्रति किलो 25 ते 30 रुपयांनी वाढले आहेत. तांदळाच्या उत्पादनात 50 ते 60 टक्क्यांनी घट झाल्यामुळे ही दरवाढ झाल्याचे समोर आले आहे.

गेली 40 वर्षे तांदळाचा व्यापार करणारे सतीश सावजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्पन्न घटल्याने तांदळाचे भाव वाढले आहेत. ग्राहक इतक्या मोठ्या दरवाढीमुळे त्रस्त असून, त्यांना प्रतिसाद देताना व्यापाऱ्यांना अडचणी येत आहेत. एक कट्टा किंवा दोन कट्टे तांदूळ घेणारे ग्राहक आता केवळ 10 किलो तांदूळ खरेदी करत आहेत.

तांदळाबरोबरच डाळींच्या दरातही 5 ते 10 रुपयांनी वाढ झाली आहे, तर तेलाचे दर सध्या स्थिर आहेत. पुढील 5-6 महिने तरी तांदळाचे भाव कमी होण्याची शक्यता नसल्याचे व्यापारी सावजी यांनी सांगितले. सरकारने साठवणुकीवर मर्यादा (200 टन) घालून काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला असला, तरी नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेली ही परिस्थिती सर्वसामान्यांसाठी चिंताजनक ठरत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group