आई तुळजाभवानीच्या मंदिर परिसरात राडा ! पुजाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी
आई तुळजाभवानीच्या मंदिर परिसरात राडा ! पुजाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी
img
Nandini khandare More
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक तुळजापुरात येत असतात. मात्र, याच तुळजाभवानी मंदिर परिसरात पुजाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात चर्चांना उधाण आलं आहे. नेमका वाद कशावरून झाला? पुजाऱ्यांमध्ये हाणामारी का झाली? आणि या घटनेनंतर प्रशासनाकडून काही कारवाई करण्यात आली आहे का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिर परिसरात हाणामारीची घटना घडली. अहिल्यानगरमधील देवीचा सेवेकरी आणि तुळजाभवानी मंदिरातील पुजारी यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिस आणि खाजगी सुरक्षारक्षकासमोर हा सगळा प्रकार घडला. अहिल्यानगरवरून आलेल्या सेवेकऱ्याकडून देवीचा पलंग विसर्जित करताना ही घटना घडली. या हाणामारीच्या घटनेमध्ये अहिल्यानगरचा सेवेकरी जखमी झाला.

 या घटनेनंतर पोलिस आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. देवीच्या सिमोल्लंघन उत्सवातच हा प्रकार घडल्याने मंदिर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. मंदिरात देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी असताना हा प्रकार घडल्यामुळे बराच वेळ त्याठिकाणी तणावाचे वातावरण होते. या हाणामारीच्या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group