Nashik: आजार बरा करतो सांगत अघोरी पूजा अन...महिलेसोबत घडलं अत्यंत भयंकर
Nashik: आजार बरा करतो सांगत अघोरी पूजा अन...महिलेसोबत घडलं अत्यंत भयंकर
img
Nandini khandare More
फसवणुकीची आणखी एक धक्कादायक घटना नाशिकमधून समोर आली आहे.  आजार बरा करतो आणि पैशांचा पाऊस पाडतो असे सांगून त्याने अघोरी पूजा केली आणि महिलेला लाखो रुपयांचा गंडा घातला. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी महिलेच्या तक्रारीनंतर भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पैशांच्या पाऊस पाडतो असे आमिष दाखवत भोंदूबाबाने पीडितेची अर्धनग्न पूजा केली. आजाराने त्रस्त महिलेचा पूजाविधीने आजार बरा करतो असे आश्वासन या भोंदूने महिलेला दिले होते. दैवी-अघोरी शक्तीने पैशाचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने त्याने महिलेची फसवणूक केली. पीडितेला अर्ध नग्न अवस्थेत बसवून पूजा केली आणि साडेसात लाख रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी भोंदूविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

पनवेलच्या अस्थमा झालेल्या पीडितेची आजार बरा करून देण्यासह पैशांच्या पावसाचं आमिष दाखवत नाशिकच्या गंगापूर शिवारात अघोरी पूजाविधी करण्यात आला. मात्र आजार बरा न झाल्याने तसंच पैशांचा पाऊस न पडल्यानं फसवणूक झाल्याचं पीडितेच्या लक्षात आले. त्यानंतर पीडित महिलेने गंगापूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी भोंदू अरुण पाटीलविरोधात गुन्हा दाखल केला.

दरम्यान, या प्रकरणातील संशयित भोंदू बाबा अरुण पाटील याच्याकडून खुलासाचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. आपल्यावर दाखल केलेला गुन्हा हा खोटा असल्याचा दावा त्याने केला आहे. स्थानिक उबाठा गटाचे पदाधिकारी विशाल कदम यांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करण्यात आला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ही कोणतीही शहानिशा न करता गुन्हा दाखल केल्याचा दावा देखील अरुण पाटीलने केला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group