सराफा बाजारात खळबळ ! डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका घोषणेमुळे सोन्याच्या दरात उलथापालथ !  सोने थेट  ..
सराफा बाजारात खळबळ ! डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका घोषणेमुळे सोन्याच्या दरात उलथापालथ ! सोने थेट ..
img
Nandini khandare More
गेल्या अनेक महिन्यांपासून सोने चांदीच्या भावात मोठे चढ -उतार होत असून आता एक टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष यांनी केलेल्या विधानाचा थेट जागतिक बाजारापेठेवर परिणाम झाला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका घोषणेमुळे सोन्याच्या दरात होणारी घसरण थांबली आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याचे दर सातत्याने घसरताना दिसले. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका घोषणेमुळे सराफा बाजारात खळबळ उडाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट म्हटले की, अमेरिकेतील निवडणुका होऊ पर्यंत कोणत्याही युद्धात अमेरिका भाग घेणार आहे. ही एक अत्यंत मोठी घोषणा म्हणावी लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू आहे. ज्याचा फटका अमेरिकेला बसला. त्यातच आता तोंडावर निवडणुका आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धात उतरणार नसल्याची माहिती दिल्यानंतर जगाने सुटकेचा निश्वास घेतला.

इराण आणि अमेरिका युद्धात जग होरपळले जात आहे. सर्वांनाच या युद्धाचा फटका बसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाने जागतिक बाजारात पुन्हा तेजी बघायला मिळतंय. काही दिवसांपासून कोसळणारे सोने पुन्हा तेजीत आले. सोन्याच्या दरात थपकण 2 हजारांनी वाढ झाली. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 2 हजारांनी वाढ होऊन 148000 वरून 150000 वर पोहोचले.

पुढील काळात भारतात मोठ्या संख्येने सणवार आहेत. त्यावेळी सोन्याची प्रचंड मागणी वाढणार आहे. सोन्याचा दर 155000 वर जाण्याचा अंदाज आहे. फक्त सोनेच नाही तर चांदीच्याही दरात मोठी वाढ होऊ शकते. आयबीजेएच्या दरांनुसार, काल 24 कॅरेटचा सोन्याचा दर 149430 रूपये तोळा होता. 22 कॅरेट सोन्याचा दर 136880 रूपये होता.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे येणाऱ्या दिवसात सोन्याचे भाव अधिक वाढणार हे स्पष्टच आहे. भारतात पुढच्या महिन्यापासून सणांना सुरूवात होईल. यासोबतच लग्नसराईही सुरू होईल, त्यापूर्वीच सोन्याच्या भावात वाढ होणार असल्याचे जवळपास स्पष्टच आहे. इराण आणि अमेरिका युद्धाचा मोठा फटका भारतालाही बसताना दिसला. भारतात कच्च्या तेलाची मोठी समस्या होती. महागाईही वाढताना दिसली. यादरम्यान भारताच्या मदतीला धावून रशिया आला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group