Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरणीचा धडाका! १० तोळ्यांमागे हजारोंची बचत, पाहा आजचे दर
Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरणीचा धडाका! १० तोळ्यांमागे हजारोंची बचत, पाहा आजचे दर
img
Nandini khandare More

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशातच आज सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. तब्बल १० तोळे सोन्याच्या खरेदीवर ४,९०० रुपयांची बचत होण्याची संधी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे लग्नसराईसाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. आज १८ कॅरेट, २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याचा नेमका भाव किती आहे? जाणून घेऊया सविस्तर.

आज सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल पाहायला मिळाला. आज २४ कॅरेटचे १ तोळा सोनं ४९० रुपयांनी स्वस्त झालं. तर आज चांदीच्या दरात काहीच बदल झालेला नाही. सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे दर किती ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ४९० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,२५,०८० रुपये खर्च करावे लागतील. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ४,९०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज ग्राहकांना १२,५०,८०० रुपये खर्च करावे लागतील.

आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ४५० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,१४,६५० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात ४,५०० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना ११,४६,५०० रुपये खर्च करावे लागतील. २४ आणि २२ कॅरेटपाठोपाठ १८ कॅरेटचे सोनं देखील आज स्वस्त झालं आहे. आज १८ कॅरेटचे १ तोळा सोनं ३७० रुपयांनी स्वस्त झाले आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना ९३,८१० रुपये खर्च करावे लागतील. १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ३,७०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज ग्राहकांना ९,३८,१०० रुपये खर्च करावे लागतील.

आज सोनं स्वस्त झालं असली तरी चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नाही. आज १ ग्रॅम चांदीचा दर १७५ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा आजचा १,७५,००० रुपये इतका आहे. आज चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे चांदी खरेदी करणं देखील फायदेशीर राहणार आहे. लग्नसराई असल्यामुळे ग्रहाक सोनं-चांदी खरेदी करत आहेत. अशामध्ये सोनं-चांदीच्या दरातील घसरण असल्यामुळे त्यांच्या खिशावर जास्त ताण येत नाही.
इतर बातम्या
Join Whatsapp Group