आज पुन्हा सोन्याच्या किंमतीत उसळी; आजचे रेट काय ?
आज पुन्हा सोन्याच्या किंमतीत उसळी; आजचे रेट काय ?
img
Nandini khandare More

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात सारखे चढ उतार सुरु असून आज पुन्हा एकदा सोन्याचे नवे दार समोर आले आहेत. त्यामुळे ऐन लग्नसराई मध्ये ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे. 



काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने आणि चांदीची खरेदी करु नका असे आवाहन नागरिकांना केले. त्यानंतर सोन्याचा भाव हा सतत वाढत असल्याचे चित्र आहे. वाढलेले भाव पाहून सर्वसामान्यांना सोने खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागणार आहे.

जळगावचे सराफ बाजारात सोन्या आणि  चांदीच्या दरात आज चांगलीच वाढ झाली आहे. सोन्या आणि चांदीच्या दरात प्रत्येकी 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे. हे नवे दर पाहून सर्वसमान्यांना घाम फुटणार आहे.

आज 10 ग्रॅम सोन्यासाठी जीएसटी सह 1 लाख 62 हजार 225 रुपये मोजावे लागणार आहेत. तर एक किलो चांदीचे भाव जीएसटीसह 2 लाख 80 हजार 160 रुपयांवर पोहोचले आहेत.


इतर बातम्या
Join Whatsapp Group