सोन्या-चांदीच्या दरात दररोज चढ-उतार पाहायला मिळत असून, सराफा बाजारातील बदलांकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. अशातच ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. चांदीच्या दरात तब्बल १ हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे चांदी खरेदी करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे सोन्याचे दर काय आहेत? २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव किती? तसेच एक किलो चांदी खरेदी करण्यासाठी किती रुपये मोजावे लागतील? जाणून घेऊया आजचे सोन्या-चांदीचे ताजे दर.
जळगाव सराफ बाजारात आज (ता. १४) सोन्याचे भाव स्थिर राहिले आहेत, तर चांदी एक हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. बुधवारी (ता. ११) सोन्याचा भाव १ लाख ४१ हजार ५०० रुपये (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) होता.
गुरुवारी (ता. १२) बाजार उघडल्यानंतर सोन्याच्या दरात अडीच हजार रुपयांची मोठी घसरण होऊन भाव १ लाख ३९ हजार रुपयांवर आला; तर शुक्रवारी (ता. १३) तो आणखी कमी होऊन १ लाख ३६ हजार ५०० रुपयांवर पोहोचला. आज (ता. १४) सोन्याच्या भावात कोणताही बदल न होता ते १ लाख ३६ हजार ५०० रुपयांवर स्थिर राहिले आहे.
दुसरीकडे, चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. बुधवारी १ लाख ९० हजार रुपये (प्रतिकिलो, विनाजीएसटी) असलेली चांदी गुरुवारी पाच हजारांनी घटून १ लाख ८५ हजारांवर आली होती. काल (ता. १३) चांदी १ लाख ८१ हजारांवर होती, तर आज त्यात आणखी एक हजार रुपयांची घट होऊन भाव १ लाख ८० हजार रुपयांवर खाली आला आहे. आजचे दर (विनाजीएसटी): सोने (२४ कॅरेट): १,३६,५०० रुपये (प्रति १० ग्रॅम) सोने (२२ कॅरेट): १,२५,०३५ रुपये (प्रति १० ग्रॅम) चांदी: १,८०,००० रुपये (प्रति १ किलो)
काही दिवसांतील सोन्याचे भाव (विनाजीएसटी) ८ नोव्हेंबर - १ लाख ४२ हजार ९ नोव्हेंबर - १ लाख ४३ हजार ५०० १० नोव्हेंबर- १ लाख ४२ हजार ८०० ११ नोव्हेंबर -१ लाख ४१ हजार ५०० १२ नोव्हेंबर- १ लाख ३९ हजार १३ नोव्हेंबर १ लाख ३६ हजार ५०० रुपये १४ नोव्हेंबर १ लाख ३६ हजार ५०० रुपये