गेल्या अनेक दिवसांपासून सोने चांदीच्या दरात मोठी उलथापालथ होत असतानाच आता गणेशोत्सवात मात्र खरिदारांसाठी दिलासदायक बातमी समोर आली आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोने आणि चांदीचे दर काय आहेत जाणून घेऊया. आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर जैसे तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करात असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात कोणतेही बदल झालेले नाही. तर चांदीच्या दरात 1 हजार रूपयांची वाढ झाली आहे. आज सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 55 हजार 530 रुपयांवर स्थिर आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 39 हजार 990 रुपये आहे.