सातपूर-पिंपळगाव बहुला रोडवर सिटी लिंक बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
सातपूर-पिंपळगाव बहुला रोडवर सिटी लिंक बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
img
दैनिक भ्रमर

सातपूर : सातपूर-पिंपळगाव बहुल रोडवर सिटी लिंक बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. पिंपळगाव जकात नाक्याजवळ झालेल्या या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, मृत दुचाकीस्वाराची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुचाकी क्रमांक एमएच १५ एल ४१३२ ही नाशिकहून पिंपळगाव बहुला रोडच्या दिशेने जात होती. याचदरम्यान पिंपळगाव जकात नाक्याजवळ सिटी लिंक बस क्रमांक एमएच १५ जेव्ही ७६८४ आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. या अपघातात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून अपघाताची प्राथमिक माहिती घेतली. मृत दुचाकीस्वाराची ओळख पटविण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपासही केला जात आहे. बस आणि दुचाकीच्या धडकेची परिस्थिती तसेच अपघातास कारणीभूत ठरलेले घटक याबाबत तपासानंतर अधिक स्पष्टता येणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group