सातपूर-त्र्यंबक रोडवर पहाटे जोरदार धडक देऊन वाहनचालक पसार; तरुणाचा जागीच मृत्यू
सातपूर-त्र्यंबक रोडवर पहाटे जोरदार धडक देऊन वाहनचालक पसार; तरुणाचा जागीच मृत्यू
img
दैनिक भ्रमर

सातपूर (भ्रमर प्रतिनिधी) :- सातपूर-त्र्यंबक रोडवरील मन्नाज वाईन्स सर्कल येथे अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत 33 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज ( दि.19) सकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास घडली. संग्राम मिलिंद साळी (वय 33, रा. जुने सातपूर कॉलनी, सातपूर, नाशिक) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संग्राम साळी हे आज सकाळी मन्नाज वाईन्स सर्कल परिसरातून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल गिरीश भुसारे व कॉन्स्टेबल अमोल आगवणे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. अपघात नेमका कसा घडला आणि धडक देणारे वाहन कोणते, याचा तपास सातपूर पोलीस करीत आहेत.

Nashik : सुप्रसिद्ध सायंताराचे FSSAI नोंदणी प्रमाणपत्र निलंबित; "हे" आहे कारण

संग्राम साळी यांच्या पश्‍चात आई, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. संग्राम साळी हे सातपूर येथील प्रसिद्ध गोल्डन मॅन मकरंद साळी यांचे पुतणे असल्याची माहिती समोर आली आहे. तरुण वयात झालेल्या या दुर्दैवी निधनामुळे साळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group