भाऊबीजेच्या खास मुहूर्तावर सोने खरेदीचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, सोन्याचे दर नेमके कितीने कमी झाले? २२ आणि २४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय आहे? चांदीच्या दरातही घसरण झाली आहे का? जाणून घेऊया सविस्तर…
आज सराफा बाजारात मोठा उलटफेर झाला आहे. भाऊबीजेच्या दिवशीच सोनं तब्बल 1300 रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर चांदीचे भाव स्थिर आहेत. त्यामुळे बहिणींसाठी सोनं खरेदी करण्याची ही नामी संधी आयतीच चालून आली आहे.
ऐन दिवाळीत ग्राहकांसाठी मोठी खूश खबर आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तर चांदीचे दर मात्र स्थिर आहेत. सोन्याच्या दरात 1 हजार 300 रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचे दर जैसे थे आहेत. आज सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 45 हजार 745 रुपये इतका आहे. तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 95 हजार 700 रुपये इतका झाला आहे. आज भाऊबीज असल्याने भावाकडून बहिणीला सोनं गिफ्ट देण्याची चांगली संधी चालून आली आहे.
किरकोळ बाजारातील भाव
किरकोळ बाजाराच्या आज विविध कॅरेटच्या सोन्याच्या किमतींमध्ये किंचित घसरण झालेली आहे. आज देशात 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 14,198 रुपये प्रति ग्रॅम आणि 1,13,584 रुपये प्रति 8 ग्रॅम आहे. कालच्या तुलनेत त्याच्या किमतीत अनुक्रमे 71 रुपये आणि 568 रुपयांची घसरण झाली आहे.
दागिने बनवण्यासाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या 22 कॅरेट सोन्याचा भाव आज 13,015 रुपये प्रति 1 ग्रॅम आणि 1,04,120 रुपये प्रति 8 ग्रॅम आहे. तो कालच्या तुलनेत अनुक्रमे 65 रुपये आणि 520 रुपयांनी स्वस्त झाला आहे. 18 कॅरेट सोन्याची किंमत आज 10,649 रुपये प्रति 1 ग्रॅम आणि 85,192 रुपये प्रति 8 ग्रॅमवर आली आहे. यात कालच्या तुलनेत अनुक्रमे 53 रुपये आणि 424 रुपयांची घट दिसून आली आहे. या किमतींमध्ये जीएसटी (GST) आणि मेकिंग चार्ज समाविष्ट नाहीत. स्थानिक कर आणि ज्वेलर्सनुसार अंतिम किमतींमध्ये थोडा फरक होऊ शकतो.
चांदीचा भाव काय?
आज चांदीची किंमत 3,570 रुपयांनी वाढून 1,86,660 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. तर काल तिचे क्लोजिंग सुमारे 1,83,090 रुपये प्रति किलोग्रॅमवर झाले होते. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरही चांदी 3,317 रुपयांच्या वाढीसह 1,85,893 रुपये प्रति किलोग्रॅमच्या पातळीवर व्यवहार करत आहे. किरकोळ बाजारात आज चांदीची किंमत सुमारे 2,00,000 रुपये प्रति किलोग्रॅमच्या पातळीवर कायम आहे.