ठाकरे गटाला मोठे खिंडार! माजी आमदारासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!
ठाकरे गटाला मोठे खिंडार! माजी आमदारासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!
img
Nandini khandare More
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हिंगोलीमध्ये मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षातील माजी आमदारांसह जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि अनेक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकाच वेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडल्याने हिंगोलीच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. 

 मराठवाड्यातील आदिवासी समाजाचे नेते आणि माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांनी आपल्या समर्थकांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. डॉ. टारफे यांच्यासोबत जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि शेकडो कार्यकर्त्यांनीही पक्षांतर केले.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कळमनुरी मतदारसंघातून शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात डॉ. संतोष टारफे यांनी निवडणूक लढवली होती. या लढतीत त्यांचा पराभव झाला असला, तरी त्यांनी तब्बल ९१ हजार मते घेतली होती. या पक्षप्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात ठाकरे गटाच्या संघटनात्मक रचनेला धक्का बसला असून, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत माजी आमदारांसह जिल्हास्तरीय पदाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचा समावेश झाला आहे. 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी लवकरच हिंगोलीत मोठा मेळावा आयोजित करण्याचे आवाहन करत, आपण स्वतः या मेळाव्याला उपस्थित राहू, असेही सांगितले. पक्षप्रवेश करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करून त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
इतर बातम्या
Join Whatsapp Group