‘मुरासू’ चक्रीवादळामुळे हवामानात मोठा बदल! महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
‘मुरासू’ चक्रीवादळामुळे हवामानात मोठा बदल! महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
img
Nandini khandare More
महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठा बदल होण्याची शक्यता आहे. ‘मुरासू’ चक्रीवादळामुळे पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असून, राज्यातील १४ जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा आहे? जाणून घेऊया सविस्तर.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘मुरासू’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठा बदल होण्याची शक्यता आहे. ‘मुरासू’ चक्रीवादळामुळे पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असून, राज्यातील १४ जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा आहे? जाणून घेऊया सविस्तर.

आंध्र प्रदेशच्या दिशेने पुढे सरकत असलेले हे चक्रीवादळ अधिक शक्तिशाली होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावरही दिसून येत आहे. आज राज्यातील १४ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना खबरदरी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील काही भागांमध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

याशिवाय रायगड, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सांगली आणि सोलापूर या मध्य महाराष्ट्र व कोकणातील भागांमध्येही काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्येही पावसाच्या सरी कोसळू शकतात.

राज्यातील उर्वरित भागांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. मात्र, ढगाळ वातावरण असले तरी काही ठिकाणी उन्हाचा तडाखा कायम राहू शकतो. तापमानात चढ-उतार होण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुरासू वादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाला पोषक वातावरण तयार होऊन दिवाळीच्या तोंडावर पाऊस धुमाकूळ घालण्याची चिन्ह दिसत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group