गेल्या काही दिवसांमध्ये विमान अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दरम्यान आता अशाच एका भीषण विमान अपघाताची बातमी समोर आली आहे. फिलीपाईन्समध्ये हवाई दलाच्या दोन विमानांची हवेतच धडक झाली. या दुर्घटनेत चार वैमानिकांचा मृत्यू झाला. दोन्ही विमाने प्रशिक्षणासाठी वापरली जात होती. हवाईतळाच्या हद्दीतच हा भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, लिपान सिटीच्या फर्नांडो हवाईतळाच्या हद्दीत प्रशिक्षणासाठी वापरात असलेल्या दोन्ही विमानांची धडक झाली. या अपघातामध्ये विमानांमध्ये असलेल्या चारही पायलटचा मृत्यू झाला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, फिलिपाईन्स एअर फोर्सच्या दोन विमानाचा हवेतच अपघात झाला आहे. या विमानांची समोरासमोर धडक झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातानंतर हे दोन्ही विमान खाली कोसळले, या अपघातामध्ये विमानात असलेल्या चारही पायलटचा मृत्यू झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार लिपान सिटीच्या फर्नांडो एअरबेसवर ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान फिलिपाईंन्स एअर फोर्सकडून या अपताबाबत दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच तातडीने बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. मात्र या अपघातामध्ये विमानातील एकही व्यक्ती वाचू शकलेला नाही. मृत पायलटच्या कुटुंबीयांना या अपघाताची माहिती कळवण्यात आली आहे, असं फिलिपाईन्स एअर फोर्सच्यावतीने माहिती देण्यात आली आहे.
ज्या विमानांचा अपघात झाला आहे, ते दोन्ही विमान 66 वर्ष जुन्या मॉडेलचे आहेत. 1960 मध्ये इटलीमध्ये या विमानांचं डिझाइन करण्यात आलं होतं. हे विमान खूप जुन्या मॉडेलचे असल्यामुळे फिलिपाईन्स एअर फोर्समध्ये या विमानांचा वापर फक्त ट्रेनिंगसाठीच केला जायचा, परंतु ट्रेंनिग सुरू असतानाच या विमानाचा अपघात झाला. हे विमान खूप हलक्या वजनाचे असतात, त्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या वेळी देखील या विमानांचा वापर करतात.