मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा; आव्हाडांनी स्पष्ट केली भूमिका
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा; आव्हाडांनी स्पष्ट केली भूमिका
img
Nandini khandare More
डिलिमिटेशन विधेयकावरून देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या विधेयकाबाबत आपली भूमिका स्पष्ट केल्याचं समोर आलं आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात मोठं विधान केलं असून, त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. नेमकं शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका काय? जितेंद्र आव्हाड काय म्हणाले? जाणून घेऊया सविस्तर.

डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी डिलिमिटेशन विधेयकावर महत्त्वाचे वक्तव्य केले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून हा निर्णय घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "डिलिमिटेशन विधेयकाबाबत शरद पवारांनी सांगितले होते की, डिलिमिटेशन हे संवैधानिक आहे. ते आज ना उद्या करावेच लागेल. त्यामुळे मतदारसंघ बांधण्यावर काम करा, असा सल्ला शरद पवारांनी दिला होता. आमच्या खासदारांबाबत सुप्रिया सुळे यांनी भूमिका जाहीर केली आहे. सुप्रिया सुळे यांनी मांडलेली भूमिका ही पक्षाची भूमिका आहे आणि तोच आमचा व्हीप असेल."
इतर बातम्या
Nashik : FDA ची

Join Whatsapp Group