राजकीय वर्तुळात खळबळ ! मनसेच्या ''या'' बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी
राजकीय वर्तुळात खळबळ ! मनसेच्या ''या'' बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी
img
Nandini khandare More
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.

मावळ तालुक्यात अवैध धंदे आणि अमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीविरोधात आवाज उठवणाऱ्या मनसेच्या तालुकाध्यक्षांनाच जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मावळ तालुकाध्यक्ष अशोक कुटे यांना फोनवरून अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक कुटे यांनी मावळ तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याविरोधात आवाज उठवत पोलिसांकडे निवदने दिली होती. तसेच अमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. यानंतर एका फोनवरून तीन जणांनी संपर्क साधत त्यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप कुटे यांनी केला आहे. या घटनेची माहिती मिळताच मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच तपासाअंती संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवणाऱ्यांनाच जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे.
इतर बातम्या
नाशिकमध्ये उद्या

Join Whatsapp Group