सुनेत्रा पवारांचा मोठा राजकीय डाव! भाजप-शिंदेसेनेला धक्का, १०० पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
सुनेत्रा पवारांचा मोठा राजकीय डाव! भाजप-शिंदेसेनेला धक्का, १०० पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
img
Nandini khandare More
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षसंघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची राजकीय घडामोड घडवून आणली आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील तब्बल १०० पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये काय बदल होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

रायगडमध्ये  ही  मोठी राजकीय घडामोड घडली आहे. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मित्र पक्ष असलेल्या शिंदेसेना आणि भाजपला मोठा धक्का दिला. नुकताच खोपोलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये भाजप आणि शिंदेसेनेच्या १०० पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद चांगलीच वाढली आहे.

रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा राजकीय शक्तिप्रदर्शन केले. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने खोपोलीत शिंदेंच्या शिवसेनेसह विविध पक्षांना जोरदार झटका दिला. शिंदेसेनेसह अन्य पक्षातील १०० कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत जाहीर पक्ष प्रवेश करत पक्षाची ताकद वाढवली. गेल्या काही दिवसांपासून खोपोलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार इनकमिंग सुरू आहे.

खोपोली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संवाद मेळाव्यात खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात सध्या जोरदार चढाओढ सुरू आहे. या पक्ष प्रवेशानंतर कर्जत खालापूर मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इतर बातम्या
नाशिकमध्ये उद्या

Join Whatsapp Group