रिक्षा चालकांचा राज्यव्यापी बंद; नाशिकमध्येही कडकडीत बंदची हाक
रिक्षा चालकांचा राज्यव्यापी बंद; नाशिकमध्येही कडकडीत बंदची हाक
img
सुधीर कुलकर्णी
विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या   आंदोलन 

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीविरोधात आणि न्याय्य हक्कांसाठी राज्यभरातील रिक्षा चालकांनी एकजुटीने बंद पुकारला आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात रिक्षा बंद आंदोलन करण्यात आल्या असून, नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्व संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. यामुळे त्या दिवशी शहरातील रिक्षा वाहतूक पूर्णपणे ठप्प राहण्याची शक्यता आहे. संघटनेमध्ये सहभागी नसलेल्या व स्वतः मालक असलेल्या रिक्षा मात्र शहरात सोयी सुरू आहेत.

 राज्यव्यापी रिक्षा टॅक्सी बंद आंदोलनाला नाशिकचा जाहीर पाठिंबा, बेकायदेशीर बाईक टॅक्सी बंद झालीच पाहिजे, रिक्षाचालकांच्या न्याय हक्कांना न्याय मिळालाच पाहिजे, आता आश्वासन नको प्रत्यक्ष निर्णय हवा, रिक्षाचालकांची एकजूट झिंदाबाद.... आदी घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नाशिक जिल्हा रिक्षा टॅक्सी चालक-मालक होती समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे. 

रिक्षा चालकांच्या विविध संघटनांनी प्रशासनाकडे अनेकदा निवेदने दिली. मात्र, मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. त्यामुळे आता थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे. रिक्षा चालकांचे म्हणणे आहे की, बेकायदेशीर वाहतुकीमुळे त्यांच्या उपजीविकेवर गदा आली आहे. दिवसभर कष्ट करूनही हाती पुरेसे उत्पन्न येत नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

चौकट....
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या...
ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या ॲपआधारित बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीवर तातडीने बंदी घालावी. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या रिक्षा धोरणाची २०२४ मधील नियम व अटींची काटेकोर अंमलबजावणी करावी. रिक्षा चालकांच्या सुरक्षेसाठी व हक्कांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे. नाशिक आरटीओ कार्यालयात बोगस टॅक्सी परवाना, तसेच बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करावी. धार्मिक व आनंदी पिकनिकसारख्या नावाखाली होणाऱ्या बेकायदेशीर वाहतुकीला आळा घालावा. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ रिक्षा चालकांना मिळावा. तसेच, रिक्षा चालकांच्या मुलांसाठी शैक्षणिक मदत, आरोग्य सुविधा व आर्थिक सहाय्य द्यावे.

याशिवाय, एटीएस प्रणालीद्वारे होणाऱ्या रिक्षा तपासणीत सुसूत्रता आणावी. वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविण्यास प्रतिबंध करावा. रिक्षा चालकांसाठी एकच नियम आणि ॲपआधारित कंपन्यांसाठी वेगळा नियम अशी दुटप्पी भूमिका ठेवू नये. सर्वांसाठी समान नियम लागू करावेत, अशीही मागणी आहे.

बंदच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संघटनांनी शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. रिक्षा चालकांनी एकजूट दाखवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. प्रशासनाने वेळीच मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतल्यास आंदोलन मागे घेण्याचा विचार केला जाईल, असेही संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

 या धरणे आंदोलनात नासिक शहर व जिल्हातील संयुक्त रिक्षा टॅक्सी चालक-मालक संघटना श्रमिक सेना भद्रकाली टॅक्सी युनियन नव संघर्ष रिक्षा चालक-मालक संघटना नाशिक रोड रिक्षा चालक-मालक संघटना शिव वाहतूक सेना व विद्यार्थी वाहतूक सेना राष्ट्रवादी वाहतूक सेना इतर समभाग्य रिक्षा टॅक्सी मालक चालक संघटना यांचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाल्या असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर ठिय्या आंदोलन केले जाणार असल्याचे युनियनच्या वतीने सुनील बागुल, बाळासाहेब पाठक, हैदर सय्यद,समाधान अहिरे, नितीन मूर्तडक, सनी वाघ, अजीम सय्यद, सागर भास्कर आदींनी सांगितले.
इतर बातम्या
नाशिकमध्ये उद्या

Join Whatsapp Group