कोतवाल पदाची १५ नोव्हेंबरला होणारी लेखी परिक्षा पुढे ढकलली ; ''ही'' आहे नवी तारीख
कोतवाल पदाची १५ नोव्हेंबरला होणारी लेखी परिक्षा पुढे ढकलली ; ''ही'' आहे नवी तारीख
img
दैनिक भ्रमर
उमेदवारांच्या वयोमर्यादेत येणार शिथिलता

पेठ - नाशिक विभागातील महसूल सेवक ( कोतवाल) २०२६ च्या  निघालेल्या कोतवाल संवर्गातील रिक्त जागांच्या जाहिराती नुसार होणारी १५ नोव्हेंबर  रोजीची लेखी परिक्षा तूर्तास पुढे ढकलली असल्याचे जिल्हाधिकारी यांचे कडुन  पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.तरी लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांनी याची नोंद घ्यावी

नवीन जाहिरात व सुधारित परीक्षेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे तालुकानिहाय रिक्त जागांची यादी बनविणे २३.११.२०२६ ते ३०.११.२०२६ 
रिक्त जागांनुसार बिंदुनामावली तयार करणे

१.१२.२०२६ ते १५.१२.२०२६ परीक्षा भरतीकरिता समिती स्थापना१५.१२.२०२६ जाहिरातीचा कालावधी १६.१२.२०२६ ते ३१.१२.२०२६ अर्जाची छाननी १.०१.२०२७ ते ०७.०१.२०२७ प्रवेशपत्र उपलब्ध करून देणे ०८.०१.२०२७ ते १५.०१.२०२७

लेखी परीक्षा १७.०१.२०२७ उत्तरसूची व निकाल घोषणा १८.०१.२०२७ दस्तऐवज पडताळणी १८.०१.२०२७ ते २५.०१.२०२७ अंतिम नियुक्तीपत्र निर्गमित करणे २६.०१.२०२७  कोतवाल संवर्गातील होणा-या परीक्षेच्या बदलाची पात्र उमेदवारांनी नोंद  घेण्याचे आव्हान  तहसीलदार  शिवाजी गवळी यांनी केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group