दिवाळीच्या फटाक्यांचा कहर! सहा जणांच्या डोळ्यांना मोठी इजा
दिवाळीच्या फटाक्यांचा कहर! सहा जणांच्या डोळ्यांना मोठी इजा
img
Nandini khandare More
दिवाळीचा सण उत्साहात साजरा करताना फटाक्यांची आतषबाजी काही जणांसाठी धोकादायक ठरली आहे. फटाके फोडताना झालेल्या अपघातांमध्ये सहा जणांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्या डोळ्यांतून रक्तस्राव झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर विशेष उपचार सुरू आहेतया घटनेमुळे फटाके फोडताना किती काळजी घेणं गरजेचं आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या दिवशी काही जण फटाके फोडत असताना अचानक त्यांच्या डोळ्यांना इजा झाली. या सहाही जणांच्या डोळ्यांतून रक्त येऊ लागल्याची माहिती समोर आली आहे. फटाक्यांमधून उडालेले जळते कण किंवा स्फोटाचा परिणाम यामुळे डोळ्यांना गंभीर दुखापत झाल्याची शक्यता आहे. ही  धक्कादायक घटना  हैदराबादमधून समोर आली आहे. 

या घटनेतील जखमींमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. त्यामुळे या घटनेची गंभीरता आणखी वाढली आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group