मोठी बातमी ! शरद पवार यांची अचानक प्रकृती बिघडली ; उपचारासाठी रुग्णालयात दाखल
मोठी बातमी ! शरद पवार यांची अचानक प्रकृती बिघडली ; उपचारासाठी रुग्णालयात दाखल
img
Nandini khandare More
राज्याच्या राजकारणातून एक मोठी  बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची अचानक प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार ,  शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे. शरद पवार यांना पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुबी रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं आहे. मात्र, पवारांना नेमकं काय झालं? अचानक तब्येक कशी बिघडली? याची काहीच माहिती देण्यात आलेली नाही. पवार कुटुंबीय आणि डॉक्टरांकडून अद्याप पवारांच्या प्रकृतीची माहिती देण्यात आलेली नाही.

शरद पवार यांनी शनिवार 31 ऑक्टोबर आणि रविवार 1 नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी गाव आणि पंढरपूर तालुक्यातील दुधाळी गावाला भेट दिली होती. यावेळी तुळशी गावात त्यांनी दुष्काळग्रस्त परिस्थितीचा आढावा घेतला होता. येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्याही ऐकून घेतल्या होत्या. या समस्या सरकार दरबारी मांडण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं होतं.

अचानक दौरा रद्द
मात्र, आज होणारा शरद पवार यांचा दुष्काळी दौरा रद्द करण्यात आला होता. हवामानातील प्रतिकूल परिस्थितीचं कारण देऊन हा दौरा रद्द करण्यात आला होता. मात्र, पवार यांची प्रकृती बिघडल्यामुळेच हा दौरा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर पवार हे सोलापूरहून पुण्याला आले होते. पण त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुबी रुग्णालयात त्यांच्या विविध चाचण्या केल्या जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, पवारांना नेमकं काय झालं हे अद्याप समोर आलं नाही.
इतर बातम्या
Join Whatsapp Group