मंत्री गिरीश महाजन यांनी दिले महंत ग्यानदास यांना निमंत्रण
मंत्री गिरीश महाजन यांनी दिले महंत ग्यानदास यांना निमंत्रण
img
चंद्रशेखर गोसावी
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- आज दि. 31 ऑक्टोबर रोजी होत असलेल्या संयुक्त कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण समारंभाचे निमंत्रण गेल्या दोन सिंहस्थांपासून नाशिकच्या सिंहस्थाच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावणारे श्रीमहंत ग्यानदास महाराजांना पालकमंत्री गिरीश महाजन व अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिले.
आज दि. 31 ऑक्टोबर रोजी नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणार आहे. या समारंभाला साधू-महंतांनी उपस्थित राहण्यासाठी निमंत्रणे देण्यात आली आहेत. त्यात महंत ग्यानदास महाराजांनाही निमंत्रण देण्यात आले.

यावेळी महंत संजय दास महाराज, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या समावेत आ. देवयानी फरांदे, महापौर हेमगौरी आहेर, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, महानगरपालिका स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप व भाजपा मनपा गटनेते अ‍ॅड. श्याम बडोदे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी कुंभमेळ्याबाबत महंत ग्यानदास यांच्याशी चर्चा केली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group