महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीच्या निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांतील निवडणुकीत कोण बाजी मारणार, कोणाला पराभवाचा सामना करावा लागणार आणि कोणत्या पक्षाची ताकद वाढणार, याबाबत उत्सुकता होती. मतमोजणीनंतर विविध मतदारसंघांतील निकाल समोर येऊ लागले असून, काही ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला, तर काही ठिकाणी विरोधी पक्षांच्या उमेदवारांनीही यश संपादन केले. या निकालांमुळे राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. नेमक्या कोणत्या मतदारसंघात कोण विजयी झाले, कोण पिछाडीवर राहिले आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची कामगिरी कशी राहिली, जाणून घेऊया.
राज्यातील विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेस आणि ठाकरेंना मात्र जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने दोन जागांवर विजयाकडे वाटचाल केली आहे. ५ मतदारसंघांमधून हाती आलेल्या आकडेवारीनुसार महायुतीचे उमेदवार आघाडीवर असून काही ठिकाणी विजयही निश्चित झाला आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, महायुतीने मुसंडी मारलीय.
अमरावतीतून शिंदेसेनेचे किरण सरनाईक आणि पुण्यातून कौस्तुभ गावडे विजयी झाले आहेत. तर नागपूरमधून सुधाकर कोहळे आघाडीवर आहेत. पुणे पदवीधरमधून मविआच्या हर्षदा देशमुख यांचा विजय जवळपास निश्चित झालाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी पवारांच्या पक्षाचे प्रतापसिंह पाटीलही पुढे आहेत. विधानपरिषद निवडणुकीच्या या निकालांमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे.