आजचे राशिभविष्य :  ''या'' दोन राशींना आज मिळणार आर्थिक यश ! जाणून घ्या, तुमचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य : ''या'' दोन राशींना आज मिळणार आर्थिक यश ! जाणून घ्या, तुमचे राशिभविष्य
img
Nandini khandare More

वृषभ 
वृषभसाठी मंगळवार उत्तम आहे. काही सवयींमध्ये सुधारणा केल्यास दिवस अधिक चांगला जाईल. जुन्या गुंतवणुकीतून मिळालेल्या पैशांमुळे आर्थिक स्थिती मजबूत आहे. नोकरी असो वा व्यवसाय तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. कुटुंबातील सदस्यांसाठी गिफ्ट घेणार आहात. तसेच त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही आध्यात्मिक आहात त्यात अधिक भर पडेल. कौटुंबिक जीवनात प्रेम, समजूतदारपणा वाढेल.

मिथुन - 
मिथुनसाठी मंगळवारी जास्त मेहनत आहे पण काम करण्याचा कंटाळा येईल. तुम्ही चांगले काम केले तरच तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाणार आहे. आर्थिक व्यवहारांशी संबंधित सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. घाऊक व्यापाऱ्यांनी सध्या मोठ्या प्रमाणात माल साठवून ठेवणे टाळावे. तुमचे बोलणे चांगले आणि मधुर ठेवा तरच काम होईल. तुम्ही इतरांना सहज आकर्षित करू शकाल.

कर्क - 
कर्कसाठी मंगळवार उत्तम असून नोकरीत यश मिळेल आणि व्यवसायातून आर्थिक लाभ होईल. इतरांना त्यांचे विचार व्यक्त करण्यापासून रोखू नका.समोरच्या व्यक्तीचे ऐका त्यामुळे तुमचेचे भले होईल. स्वतःच्या गुणवत्तेत सातत्याने सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. साहित्यिकांना एखादी मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. कौटुंबिक वाद संपुष्टात येण्याची शक्यता आहे. वेळेचा योग्य उपयोग करा आणि वाईट संगतीपासून दूर राहा. आई-वडिलांच्या सल्ल्याचे पालन करा त्यामुळे समस्येवर मात कराल.

सिंह 
सिंह राशीसाठी नशिबाची उत्तम साथ असणार आहे. मिळकतीत वाढ झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल. अचानक एखादे काम समोर आल्याने ठरवलेल्या योजनांमध्ये बदल करावा लागू शकतो. बदल तुमच्यासाठी सकारात्मक आहे. कामकाजाच्या दृष्टीने दिवस उत्तम असून लाभ मिळण्याचे योग आहेत. जोडीदाराला एखादी भेटवस्तू देण्याचे आश्वासन देऊ शकता.

कन्या 
कन्या राशीने आर्थिक अडचणी टाळण्यासाठी अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. वादाची परिस्थिती निर्माण होईल असे अजिबात वागू नका. वादामुळे तुमचेच नुकसान होईल. तुम्ही कुटुंबीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी होणार आहात. भेटवस्तू आणि सन्मान मिळण्याची शक्यता आहे. नोकरी असो वा व्यवसाय तुमच्या कामावर फोकस करा. संपर्क वाढतील त्याचा फायदा भविष्यात होईल. मार्गदर्शन आणि मदत यामुळे काम मिळविणे सोपे जाणार आहे.

तूळ 
तूळसाठी मंगळवार आनंद घेवून येणार आहे. हुशारी आणि मेहनतीच्या जोरावर कामे पूर्ण होतील. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तज्ज्ञांसोबत चर्चा कराल. कुटुंबाची भक्कम साथ मिळेल, त्यामुळे धैर्य सोडू नका. येणाऱ्या कठीण परिस्थितीचा ठामपणे सामना करा. कौटुंबिक वातावरण चांगले असेल.


वृश्चिक - 
वृश्चिकसाठी मंगळवारी काही बदल आहेत. नवीन बदलांसाठी तयार राहा. कामकाजात परिपक्वता आणि गांभीर्य दाखवणे आवश्यक आहे. कामाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारणा असून लाभाचे योग आहेत. करिअरशी संबंधित समस्या दूर होण्याचे योग आहेत. एखाद्या लग्नसमारंभात किंवा मंगलकार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.

धनु
धनुसाठी दिवस आनंदाने भरलेला असेल. पैशांशी संबंधित विविध विचार मनात येऊ शकतात. व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन मार्गांचा विचार कराल. मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी वेळ चांगली आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता किंवा त्या दिशेने प्रत्यक्ष पावले उचलू शकता. नशिबाची साथ मिळेल आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवू शकतात.

मकर - 
मकरसाठी मंगळवार उत्तम आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव सर्वत्र जाणवेल. स्वतःची प्रतिभा आणि क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. सरकारी नोकरीत असलेल्या व्यक्तींसाठी प्रमोशनचे योग आहेत. आर्थिक संकटाचा सामना करत असाल, तर काही बाबतीत दिलासा मिळू शकतो. काही महत्त्वाच्या लोकांसोबत भेट झाल्यामुळे मानसिक समाधान वाढेल. नशीब 90 टक्के तुमच्या बाजूने असेल. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा.

कुंभ 
कुंभ राशीसाठी मंगळवारी विचारांमध्ये सकारात्मक बदल जाणवतील. उत्साहाने व्यावसायिक योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. तरुणांना करिअरमध्ये अधिक चांगल्या संधींचा शोध घेता येईल. विवाहासंबंधीच्या चर्चा यशस्वी होण्याचे योग आहेत. आर्थिकदृष्ट्या वेळ चांगली आहे तसेच लाभाचे योग आहेत. व्यवहार करताना सावध राहा.

मीन 
मीन राशीसाठी मंगळवार सकारात्मक आहे. तुमची वाणी हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. कपड्यांच्या व्यापारा करत असाल तर थोडा ताण जाणवेल. झटपट नफा कमावण्याच्या प्रयत्नात चुकीचे मार्ग निवडू नका तेव्हा सावध राहा. समस्यांचे निराकरण होण्याची शक्यता आहे. तुमच्यातील संवादकौशल्य तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशाच्या शिखरावर पोहोचण्यास मदत करेल. सगळं काही चांगलं होत असताना अहंकाराला खतपाणी घालू नका.
इतर बातम्या
Join Whatsapp Group