न्यूझीलंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना ख्राइस्टचर्चच्या स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात थरारक विजयाची नोंद केली. भारतीय संघाने ४ गडी राखून विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी घेतलीय. या सामन्यात भारतीय संघासमोर १८१ धावांचे लक्ष्य होते. मात्र धावांचा पाठलाग करताना संघाची धावसंख्या ७० असताना पाच फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते.
न्यूझीलंडच्या हातातून विजय अक्षरशः खेचून घेत भारतीय संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात थरारक विजयाची नोंद केली. क्राइस्टचर्च येथील हेगले ओव्हल मैदानावर झालेल्या या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा चार विकेट्सनी पराभव केला. विजयासाठी शेवटच्या षटकात ११ धावांची गरज असताना तिलक वर्मा आणि नितीश कुमार रेड्डी यांनी संयम आणि आक्रमकतेचा सुरेख मेळ साधत भारताला विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.
तिलक वर्मा नमन धीर आणि नितीश कुमार रेड्डी या त्रिकुटाने फलंदाजीमध्ये दमदार कामगिरी करत भारतीय संघाला एक रोमांचक विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. तिलक वर्माने नाबाद ५१ धावांची उत्कृष्ट खेळी केली, तर नितीश कुमार रेड्डीनेही महत्त्वाच्या टप्प्यावर नाबाद २६ धावांचे योगदान दिले आणि संघाला विजय मिळवून दिला.