बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुच्चाच्या चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. बालीमध्ये झालेल्या अपघातात मणक्याला दुखापत झाल्यानंतर नुसरतवर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या ती रुग्णालयात उपचार घेत असून, नुकताच तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपल्या प्रकृतीबाबत अपडेट दिलं आहे.
नुसरत भरुचाचा बालीमध्ये अपघात झाला होता. या अपघातात ती गंभीर जखमी झाली होती. नुसरतच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर तिला एअर अँम्ब्युलन्सने भारतात आणलं होतं. त्यानंतर आता अभिनेत्रीच्या मणक्याची सर्जरी करण्यात आली आहे. नुसरतने काही दिवसांपूर्वीच हॉस्पिटलमधला एक फोटो शेअर करत हेल्थ अपडेट दिले होते. आता तिने हॉस्पिटलमधला एक व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये नुसरत भरुचा व्हिलचेअरवर बसलेली दिसत आहे. तिच्या बाजूला उभ्या असलेल्या नर्स अभिनेत्रीची काळजी घेत आहेत. नर्स तिला जेवण भरवत असल्याचं दिसत आहे. तर नुसरत टीव्हीवर शाहरुख आणि काजोलच्या दिलवाले सिनेमातील 'रंग दे तू मोहे गेरुआ' हे गाणं बघत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला तिने कॅप्शनही दिलं आहे. "अशाप्रकारे शाहरुख आणि काजोल माझ्या चेहऱ्यावर हसू आणत आहे. नेहमीप्रमाणे हळूहळू गोष्टी ठीक होतील. हळू हळू बरी होतेय...स्वप्नही बघतेय", असं कॅप्शन तिने दिलं आहे.
नुसरत भरुचाला नेमकं काय झालेलं? नुसरत भरुचा तिच्या वैयक्तिक कामानिमित्त बाली येथे गेली होती. मात्र, तिथे तिचा अपघात झाला आणि तिच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली. या अपघातामध्ये तिच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली.यानंतर पुढील उपचारासाठी तिला एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईत आणण्यात आलं. मुंबईत आणल्यावर तिचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. तिचे असे फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आता शस्त्रक्रियेनंतर तिने शेअर केलेल्या पोस्टमुळे तिच्या प्रकृतीबाबत चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान,अभिनेत्री नुसरत भरुचाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती अभिनेता टायगर श्रॉफसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.या प्रोजेक्टच्या निमित्ताने पहिल्यांदाच नुसरत आणि टायगरची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. नुसरतच्या आगामी चित्रपटांबाबतही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.