ज्ञानेश कुमार यांचा दोन दिवसीय दौरा रद्द ! नक्की काय घडतंय ?
ज्ञानेश कुमार यांचा दोन दिवसीय दौरा रद्द ! नक्की काय घडतंय ?
img
Nandini khandare More
गेल्या 15 दिवसांत देशभरात ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधक आकिरामाक झाले आहेत. आता 10 ऑक्टोबर रोजी CJP मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. तर काल INDIA आघाडीने काल त्यांच्याविरोधात शक्तीप्रदर्शन केले. मतदार याद्यांमधील कथित घोळ, विशेष पुनर्निरीक्षण प्रक्रियेवरून (SIR) विरोधक आक्रमक झाले आहेत.

याचदरम्यान आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दोन दिवसांचा दौरा अचानक रद्द झाला. 7 आणि 8 ऑक्टोबर या दरम्यान छत्तीसगडसाठी हा दौरा होणार होता. काही अपरिहार्य कारणामुळे हा दौरा रद्द झाल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. छत्तीसगडचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने याविषयीचे पत्र दिले. त्यानुसार ज्ञानेश कुमार यांना या दोन दिवसीय दौऱ्यात राज्याचे पाहुणे, अतिथी म्हणून संबोधण्यात आले होते. 

छत्तीसगडच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानुसार, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्याच्या दौऱ्यावर होते. ते राज्याचे अतिथी म्हणून हा दौरा करणार होते. आज आणि उद्या असा त्यांचा हा दौरा होता. या दौऱ्यात ते दंतेवाडा येथेही जाणार होते. येथील दंतेश्वरी मंदिराला आणि कबीरधाममधील भोरमदेव येथील प्रसिद्ध मंदिरांना ते भेट देणार होते. तर बस्तर जिल्ह्यातील चित्रकूट धबधब्याची भेटही दौऱ्यात ठरली होती. पण काही अपरिहार्य कारणांमुळे हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group