घरात अचानक वाघाचा शिरकाव! चिमुकलीने कसाबसा वाचवला जीव; पण सहा महिन्यांच्या बाळाला जबड्यात उचलून नेलं
घरात अचानक वाघाचा शिरकाव! चिमुकलीने कसाबसा वाचवला जीव; पण सहा महिन्यांच्या बाळाला जबड्यात उचलून नेलं
img
Nandini khandare More
माणसांच्या वस्तीत वन्यप्राण्यांचा वावर वाढत असल्याच्या घटना समोर येत असतानाच एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. भरदिवसा एका घरात पट्टेदार वाघाने अचानक प्रवेश केला. घरात वाघ दिसताच चिमुकलीने घाबरून पळ काढत आपला जीव वाचवला. मात्र, या भीषण प्रसंगात वाघाने अवघ्या सहा महिन्यांच्या बाळाला आपल्या जबड्यात पकडले आणि तेथून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नेमकं पुढे काय घडलं, याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे.

 दोन चिमुकल्या मुली आणि त्यांचा सहा महिन्याचा भाऊ घरात बसले होते. इतक्यात मागील दारातून एका पट्टेदार वाघाने घरात प्रवेश केला. या वाघाने पाळण्यात असलेल्या अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुकल्याला आपल्या बलाढ्या जबड्यात पकडून नेलं. या भयंकर घटनेत चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शु्क्रवारी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. हि थरारक घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. 

नेमकं काय घडलं?
अभिमन बोंद्रे यांचे सहा महिन्यांचे बाळ आणि त्याच्या दोन बहिणी घरात असतानाच पट्टेदार वाघ घरात घुसला. वाघाने सुरुवातीला एका मुलीवर झडप घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने तिथून पळ काढल्यानं तिचा जीव वाचला. मात्र, यानंतर या वाघाने पाळण्यातील बाळावर झडप घेतली. वाघानं या बाळाला आपल्या जबड्यात पकडून घराबाहेर नेलं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group