Nashik : त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी देवस्थानांना धमकीचा ईमेल
Nashik : त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी देवस्थानांना धमकीचा ईमेल
img
Nandini khandare More

नाशिक जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि सप्तशृंगी देवीच्या देवस्थानाला धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या ई-मेलमध्ये दोन्ही मंदिरांना नुकसान पोहोचवण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता दोन्ही देवस्थानांवरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. या धमकीमागील व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  या ईमेलमध्ये मंदिरांना नुकसान पोहोचवण्याची गंभीर धमकी देण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात चिंता व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातील प्रमुख आणि अत्यंत श्रद्धेची ही दोन्ही मंदिरे असल्याने या घटनेला गांभीर्याने घेतले जात आहे. या धमकीच्या ईमेलनंतर तातडीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 

त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी या दोन्ही देवस्थानांची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. मंदिरांच्या परिसरासह संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. स्थानिक पोलीस दलाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, संशयास्पद व्यक्ती किंवा हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत, या धमकीमागील सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे.

हा धमकीचा ईमेल ६ नोव्हेंबर रोजी या दोन्ही संस्थानांना प्राप्त झाला होता.दिवाळीनिमित्त भाविकांची गर्दी लक्षात घेता बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून भाविकांनी घाबरून जाण्याची आवश्यक्यता नसल्याने ट्रस्टच्या वतीने कळविण्यात आले आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group