राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीत मोठी दुर्घटना घडली असून एक इमारत कोसळली आहे. जुन्या दिल्लीतील चावडी बाजार मेट्रो स्टेशनजवळ गुरुवारी सकाळी एका बांधकाम सुरू असलेल्या तीन मजली इमारत अचानक कोसळून पडली. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,चावडी बाजार मेट्रो स्टेशनजवळील सितारा गलीमध्ये सकाळी पावणे दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. याठिकाणी ३ मजली निर्माणाधीन इमारत अचानक कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात गोंधळाचे वातावरण आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये गुरुवारी सकाळी ९.५० वाजताच्या सुमारास चावडी बाजारमध्ये इमारत कोसळली. स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले आहे. ढिगाऱ्याखालून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. याठिकाणी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची शक्यता आहे.