राज्याच्या पोलीस आणि कारागृह प्रशासनात मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. एका राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार कारागृह उपअधीक्षकाला थेट सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून, तब्बल १७ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात चर्चांना उधाण आले आहे. नेमकं कोणत्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली? संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कोणते आरोप आहेत? तसेच मुख्यमंत्र्यांनी हा कठोर निर्णय का घेतला? जाणून घेऊया सविस्तर.
तामिळनाडूतील थेनी जिल्हा कारागृहातून १७ कैदी पळून गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आता मुख्यमंत्री थलपती विजय यांनी मोठी कारवाई केली. मुख्यमंत्र्यांनी कारागृह उपअधीक्षकांना तडकाफडकी सेवेतून बडतर्फ केले. तर कारागृहातील १७ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले. या सर्वांविरोधात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
तामिळनाडूतील २ कारागृहातील कैदी पळून जाण्याच्या घटनांनंतर मुख्यमंत्र्यांनी मोठी कारवाई केली. राज्य सरकारने कारागृह प्रशासनात मोठ्या बदल्या केल्या आहेत. बडतर्फ करण्यात आलेले कारागृह उपअधीक्षक एन. रामलिंगम हे ऑगस्ट २०२४ पासून थेनी कारागृहात कार्यरत होते. कारागृह प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेच्या देखरेखीत निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले.
मुख्यमंत्री थलापती विजय यांनी कारागृहातून कैदी पळाल्याच्या घटनेनंतर आता राज्यभरातील सर्व कारागृहांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे आणि कडक पाळत ठेवण्याचे निर्देश दिलेत. गुरूवारी सरकारने तुरूंग आणि सुधार सेवा विभागाचे पोलिस महासंचालक डॉ. संदीप राय राठोड यांची बदली केली.
कैद्याची प्रकृती खालावत असल्याचे ऐकून, एक सुरक्षा रक्षक मदतीसाठी बराकीचा दरवाजा उघडून आत गेला. त्यानंतर या कैद्यांनी सुरक्षारक्षकावर हल्ला केला त्याच्याकडे असणाऱ्या तुरुंगाच्या मुख्य दरवाजाच्या चाव्या हिसकावल्या. त्यानंतर त्यांनी मुख्य दरवाडा उघडून आजूबाजूच्या जंगालात पळ काढला. या प्रकरणी सध्या चौकशी सुरू आहे.