Nashik: सातपूर येथील कंपनी मशिनमध्ये डोके अडकून तरुणाचा मृत्यू
Nashik: सातपूर येथील कंपनी मशिनमध्ये डोके अडकून तरुणाचा मृत्यू
img
Nandini khandare More
नाशिकमधून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कंपनीत काम करत असणाऱ्या एका तरुणाचा अपघाताने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सातपूर  येथील एका कंपनीत  काम करतांना मशिनमध्ये डोके अडकून एका २१ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुमीत रामदास सपकाळे (वय २१, रा. पाडळसा, ता. यावल, जि. जळगाव, सध्या रा. केएसडब्ल्यू कॉलेजसमोर, उत्तमनगर, सिडकाे) असे मृताचे नाव आहे.

सातपूर पाेलिसांच्यामाहितीनुसार, मृत सुमीत हा आज साेमवारी(दि. २६) सकाळी आठ वाजेच्या सुमारास कंपनीत कामावर गेला होता. कंपनीतील मशीन प्लांट नंबर-२ येथे तो काम करत असताना, सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अचानक त्याचे डोके मशिनमध्ये अडकले.

या अपघातात तो गंभीर जखमी झाला व  रक्तस्त्राव झाल्याने त्याची प्रकृती खालावली. घटना घडल्यानंतर कंपनीचे प्रसाद शुक्ल यांनी सुमीतला उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात  दाखल केले. मात्र, त्याला डॉ. पाटील यांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे कामगार वर्गात आणि परिसरात शोककळा पसरली आहे

इतर बातम्या
Join Whatsapp Group