सोशल मीडियावर सध्या खाद्यपदार्थ तयार करण्याच्या प्रक्रियेचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पुरी बनवण्यासाठी लागणारं पीठ चक्क पायांनी मळलं जात असल्याचं दिसत असल्याचा दावा केला जात आहे. एवढंच नाही, तर त्याच पिठापासून पुऱ्या तळल्या जात असल्याचंही सांगितलं जात आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अन्नपदार्थांच्या स्वच्छतेबाबत आणि ग्राहकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू असून, संबंधित प्रकार नेमका कुठे घडला आणि व्हिडिओमधील दावे खरे आहेत का, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.
व्हायरल व्हिडिओमध्ये एका मोठ्या लोखंडी कढईत मोठ्या प्रमाणात पीठ ठेवलेंल दिसतं आहे. एक व्यक्ती खुर्चीवर बसून पायांनी हे पीठ मळताना दिसत आहे, तर त्याच्या शेजारी असलेली दुसरी व्यक्तीबी पायांचा वापर करून पीठ मळत असल्यांचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पीठ तयार केलं जात असल्याने हा एखाद्या मोठ्या कार्यक्रमासाठीचा स्वयंपाक असावा, असा अंदाज व्यक्त केला जातं आहे. मात्र पीठ मळण्याची ही पद्धत पाहून अनेकांनी स्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. आपण बाहेर खात असलेल्या पदार्थांची तयारी नेमकी कशी केली जाते. याबद्दलही नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
पुरीचा आकार पाहूनही लोक आश्चर्यचकित
या व्हिडिओच्या पुढील भागात एका मोठ्या टेबलावर पसरवलेलं पीठ उचलून कढईत तळण्यासाठी नेलं जात असल्याचं दिसतं. ही पुरी नेहमीच्या पुरींपेक्षा खूप मोठी आणि पातळ दिसते आहे. गरम तेलात ती पुरी टाकल्यानंतर ती फुगताना देखील व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे. कोणत्या कार्यक्रमासाठी स्वयंपाक केला जात होता याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
नेटकऱ्यांना कमेंट्समध्ये झाली उलटी
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेच्या बाबतीत चिंता व्यक्त केली आहे. काहींनी असे बाहेरचे खाताना काळजी घेण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.तर काहींनी एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करणाऱ्या कामगारांच्या मेहनतीकडेही लक्ष वेधलं आहे.