धक्कादायक !  एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यूने खळबळ ; चहा-नुडल्स खाल्ले अन ...  नेमकं काय घडल ?
धक्कादायक ! एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यूने खळबळ ; चहा-नुडल्स खाल्ले अन ... नेमकं काय घडल ?
img
Nandini khandare More

एकाच  एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद मृत्यू झालीअसल्याची घटना घडली आहे. ही घटना कशी आणि याचे नक्की कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडामधून ही घटना घडली आहे. येथे एकाच कुटुंबातील पाच जणांचे संशयास्पद स्थितीत मृतदेह सापडले आहेत. मृतांमध्ये आई-वडील आणि त्यांच्या तीन मुलांचा समावेश आहे. ही दुर्घटना ग्रेटर नोएडामधील रबूपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्युमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या कुटुंबातील सर्व सदस्यांचा मृत्यू हा कुठल्यातरी पदार्थाच्या सेवनामुळे झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कुटुंबाने शेवटच्या क्षणी चहा आणि मॅगी खाल्ली होती, असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर संशयास्पद परिस्थितीत त्यांचा मृत्यू झाला. मात्र त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी पाचही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. आता शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण समोर येणार आहे.

दरम्यान, एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूच्या प्रकरणात अन्नविषबाधेची शक्यता वर्तवली जात आहे. प्राथमिक माहितीमध्ये या कुटुंबातील सदस्यांनी काही तरी खाल्लं होतं. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्याला दुजोरा मिळू शकलेला नाही., या कुटुंबाने अखेरच्या वेळी चहा आणि मॅगी खाल्ली होती. मात्र याच कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला होता की त्यांच्या मृत्यूमागे आणखी कोणतं कारण आहे हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group