यंदा नवरात्रोत्सवात दिनदर्शिकेचा ''हा'' आगळावेगळा योग्य
यंदा नवरात्रोत्सवात दिनदर्शिकेचा ''हा'' आगळावेगळा योग्य
img
Chandrakant Barve
नाशिकरोड  (भ्रमर प्रतिनिधी):-शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत असतानाच यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात दिनदर्शिकेतील एक आगळावेगळा योग पाहायला मिळत आहे. ३१ दिवसांच्या या महिन्यात गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे वार प्रत्येकी पाच वेळा आले असून, उर्वरित रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे वार प्रत्येकी चार वेळा आले आहेत. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्याच्या दिनदर्शिकेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

३१ दिवसांच्या महिन्यात तीन वार पाच वेळा येणे ही दिनदर्शिकेच्या रचनेनुसार घडणारी बाब आहे. महिन्याचा पहिला दिवस ज्या वाराला येतो, त्यानुसार पाच वेळा येणारे तीन वार निश्चित होतात. यंदा ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस गुरुवारी आल्याने गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे वार पाच वेळा आले आहेत.

विशेष म्हणजे शारदीय नवरात्रोत्सव, दसरा आणि त्यानंतरचे सण याच महिन्यात येत असल्याने या वैशिष्ट्यपूर्ण दिनदर्शिकेची चर्चा होत आहे. अशा प्रकारचा योग काही वर्षांच्या अंतराने वेगवेगळ्या महिन्यांत पाहायला मिळतो. त्यामुळे धार्मिकदृष्ट्या हा विशेष योग नसला तरी दिनदर्शिकेच्या दृष्टीने हा महिन्याचा आगळावेगळा नमुना असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

नवरात्रोत्सवाच्या उत्साहात विविध ठिकाणी घटस्थापना, देवीच्या मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम, गरबा-दांडिया तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याने यंदाचा ऑक्टोबर महिना उत्सवांनी गजबजणार आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group