चीनच्या वाढत्या लष्करी ताकदीमुळे आशियातील अनेक देश आपल्या सुरक्षाव्यवस्थेला अधिक मजबूत करत आहेत. त्यातच जपानने आपल्या संरक्षण क्षमतेत मोठी भर घालत हायपरसॉनिक शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जपानच्या नव्या Type 25 Hyper Velocity Gliding Projectile मुळे चीनसमोर एक नवे सामरिक आव्हान उभे राहिल्याची चर्चा सुरू झाली आहे. वेग, अचूकता आणि बदलत्या मार्गामुळे हे अस्त्र भविष्यातील युद्धाचे समीकरण बदलू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
जपानने विनाशकारी महाभयंकर हायपरसोनिक मिसाईल विकसित करून जगाची झोप उडवली. जपानच्या सैन्यात समाविष्ट झालेले Type 25 Hyper Velocity Gliding Projectile हे क्षेपणास्त्र मारक क्षमतेच्या बाबतीत क्षेपणास्त्रापेक्षाही दुप्पट घातक मानले जात आहे.
ज्यामुळे चीनच्या पायाखालची जमिन सरकली आहे. याचा वेग 6200 आहे. जर जपानने हे क्षेपणास्त्र डागले तर अवघ्या 20 मिनिटांच्या आत चीनची राजधानी पूर्णपणे उद्धवस्थ करू शकते, तिथे काहीच म्हणजे काहीच राहणार नाही.
20 मिनिटात बीजिंगला पूर्णपणे उद्धवस्थ करू शकते. इतकी क्षमता त्यात आहे. याला रोखणे जगातल्या कोणत्याच डिफेन्स सिस्टिमला शक्य नाही. ब्रह्योसची रेंज 500 किलोमीटरपर्यंत असली तरीही जपानच्या या नव्या क्षेपणास्त्र थरार व्हिडीओ दाखवला.
त्यामुळे आता चीनची धाकधूक चांगलीच वाढल्याचे बघायला मिळतंय. शेवटच्या क्षणी क्षेपणास्त्र आपला मार्ग बदलू शकते. ज्यामुळे शत्रूला प्रतिहल्ला करण्याचा साधी संधीही मिळणार नाही. हा एक घातक आणि खतरनाक क्षेपणास्त्र आहे.