मोठी बातमी ! एमपीएससी आंदोलन प्रकरणात राज्य सरकारला हायकोर्टाची नोटिस
मोठी बातमी ! एमपीएससी आंदोलन प्रकरणात राज्य सरकारला हायकोर्टाची नोटिस
img
Nandini khandare More
एमपीएससी आंदोलन प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे.पुण्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन तापलंय. सरकारनं एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आंदोलकांकडून केली जातेय. दरम्यान  एमपीएससी आंदोलन प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. या प्रकरणात राज्य सरकार आणि सर्व प्रतीवादींना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून उद्या बुधवारी सकाळी १०.३० वाजता मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनावरून राज्य सरकारसह, पोलिस आणि आयोजकांना मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनांच्या विरोधात “पुणेकर” नागरिकाने थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पुणे येथील आंदोलकांनी तात्काळ जागा सोडावी, आंदोलनकर्त्यांना सरकारने निश्चित करून एक जागा द्यावी तसेच आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी याचिकाकर्त्याने मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.

पुणे पोलिस आयुक्त, पोलिस उपआयुक्त यासह तिन्ही आंदोलनाच्या प्रमुख आयोजकांना मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. राज्य सरकार, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह तिन्ही आंदोलनाचे आयोजक प्रमोद पाटील, नितीन आंधळे, चेतन वाघज यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात उद्या सकाळी १०.३० वाजता मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
MPSC |
इतर बातम्या
Join Whatsapp Group