मोठी बातमी : एमपीएससीतही पूजा खेडकर प्रकरणाची पुनरावृत्ती?
मोठी बातमी : एमपीएससीतही पूजा खेडकर प्रकरणाची पुनरावृत्ती?
img
DB
गेली काही दिवसांपासून युपीएसीद्वारे आयएएसपदी निवड झालेल्या पूजा खेडकर वादाच्या भोवऱ्यात आडकलेल्या आहेत. तसंच, त्यांच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर आल्याने त्यांच्यावर युपीएससीसह अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये सध्या चौकशी सुरू आहे. अशातच आता राज्यातही अशी प्रकरणं समोर येण्याची शक्यता आहे. याबाब महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही मोठा निर्णय घेतला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी माहती दिली आहे.



काय म्हणाले कुंभार?  

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा-२०२२च्या निवड यादीतील ८ जणांविरुद्ध तक्रारी आल्यानं महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने अर्जदार आणि प्रतिसादकर्त्यांनी अपिलीय प्राधिकरणासमोर उपस्थित राहून दिव्यांग प्रमाणपत्रांची पुन्हा पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. पडताळणीचे निर्णय ५ ऑगस्ट, २०२४ पर्यंत संबंधित प्राधिकरण आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगला कळवायचं आहेत. अपिलीय प्राधिकरणासमोर गैरहजर रहाणाऱ्यांचं दिव्यांग प्रमाणपत्र संशयास्पद मानलं जाऊन त्यांना निवड प्रक्रियेतून वगळलं जाणार आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group