पूजा खेडकरला आणखी एक दणका ; केंद्र सरकारने घेतला
पूजा खेडकरला आणखी एक दणका ; केंद्र सरकारने घेतला "हा" मोठा निर्णय
img
DB
आत्ताची मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या कारवाईनंतर IAS पद गमावलेल्या पूजा खेडकरला आता केंद्र सरकारनेही दणका दिला आहे.केंद्र सरकारनेपूजा खेडकरला भारतीय प्रशासकीय सेवेतून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. 

बनावट प्रमाणपत्र आणि नाव बदलून नियमांचे उल्लंघन करत अनेक वेळा युपीएससी परीक्षा दिल्याच्या आरोपामुळे पूजा खेडकर वादात सापडली.

पुण्यातील प्रशिक्षणार्थी काळातच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गैरवर्तणूक आणि वडिलांकडून अधिकाऱ्यांना अरेरावीची भाषा केल्यामुळे हे प्रकरण उजेडात आले होते.

केंद्रीय लोक सेवा आयोगाने चौकशी करून पूजा खेडकरवर कारवाई केली. त्यानंतर केंद्रानेही मोठा निर्णय घेतला. केंद्र सरकारने प्रशासकीय सेवा प्रोबेशन नियम,१९५४ च्या १२ व्या नियमानुसार पूजा खेडकरवर ही कारवाई केली आहे. तिला भारतीय प्रशासकीय सेवेतून तात्काळ मुक्त केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group