मुंबई : पूजा खेडकरांच्या बाबतीत मोठी अपडेट समोर आली आहे. त्यांचा महाराष्ट्रातील प्रशिक्षण कालावधी संपवण्यात आला असून मसुरीतील प्रशिक्षण संस्थेत परत बोलावण्यात आलं आहे. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत. लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने ही कारवाई केली.
पूजा खेडकर यांचं जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिलेत. लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाची कारवाई केलीय. लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाकडून ही कारवाई करण्यात आलीय. अकादमीने महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले असून पूजा खेडकर यांना २३ जुलै पूर्वी मसूरी येथील अकॅडमीमध्ये पुन्हा हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत.
खासगी गाडीवर लाल दिवा लावणे आणि स्वतंत्र केबिनसाठी आग्रह धरण यामुळे प्रोबेशनरी आयएस अधिकारी पूजा खेडकर चर्चेत आल्या होत्या.
खेडकर यांच्या शारीरिक अपंगत्व आणि ओबीसी प्रमाणपत्र इथपर्यंत पोहोचला. याच मुद्द्यांवर पंतप्रधान कार्यालय आणि मसूरी येथील लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमीने पूजा खेडकर यांची चौकशी सुरू केली होती.
उपसंचालक एस. नवल यांनी महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांना दिलेल्या पत्रात, IAS-2023 बॅचच्या पूजा खेडकरचे प्रशिक्षण थांबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलंय. पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी त्यांना तातडीने अकादमीत परत बोलावण्यात यावे. ट्रेनी व्यक्तीला तात्काळ कार्यमुक्त करावे, यासाठी राज्य सरकारला विनंती करण्यात आलीय. त्यांना लवकरात लवकर अकादमीत रुजू होण्याची सूचना करण्यात आलीय.