सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या गंभीर प्रकरणात मुंडे यांना आता अधिकृतपणे 'क्लीन चिट' मिळाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. ईओडब्ल्यू अर्थात आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची सखोल पोलिस चौकशी केली होती.
मात्र या चौकशीत त्यांच्याविरोधात काहीही आक्षेपार्ह किंवा कोणताही गैरव्यवहार आढळलेला नाही. खुद्द राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत ही महत्त्वपूर्ण माहिती अधिकृतपणे दिली आहे. त्यामुळे तुकाराम मुंडे यांच्यावरील आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे आता समोर आले असून, त्यांना या चौकशीतून मोठा दिलासा मिळाला आहे.
आयएएस तुकाराम मुंढे यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी केली होती. मुंढे हे त्यावेळी नागपूर महापालिकेचे आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ होते. याच पदावर असताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, या आरोपानंतर चौकशी होऊन त्यांना क्लिन चिट मिळाली आहे. तसेच, महिला अधिकाऱ्यांशी गैरव्यवहारप्रकरणी येत्या महिनाभरात अहवाल आल्यावर कारवाई होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
मंत्री सामंत यांनी मुंढे यांना स्मार्ट सीईओ म्हणून काम करण्याचे अधिकार बृहन्मुंबईचे तत्कालीन आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले. तसेच, त्यांच्या पदभाराचेही पत्र तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या सहीनिशी असल्याचे सांगितले. २ चौकशीत मुंढे निर्दोष निघाले तर, महिला गैरव्यवहारप्रकरणी राधिका रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी सुरू असून, ती अंतिम टप्प्यात आहे. महिन्याभरात हा अहवाल आल्यानंतर यातील तथ्यानुसार कारवाई होईल, अशी ग्वाही दिली.