मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील दुर्गम भागात वसलेले आदिवासीबहुल पडियाल गाव 'अधिकाऱ्यांचे गाव' नावाने प्रसिद्ध आहे. इथल्या प्रत्येक मुलाचे सिव्हिल सर्व्हंट, इंजिनियर किंवा डॉक्टर बनण्याचे स्वप्न आहे. 5,000 हून अधिक लोकसंख्या असलेल्या या आदिवासी बहुल गावात 100 हून अधिक लोक भारताच्या विविध भागात प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील पडियाल गावात प्रत्येक घरात एकतरी सरकारी नोकरीत आहे. या गावातील अनेक मुले अधिकारी पदावर कार्यरत आहे. अधिकाऱ्यांचं गाव म्हणून या नावाने पडियाल गाव ओळखले जाते. या गावातील प्रत्येक घरातील किमान एकतरी व्यक्ती सरकारी नोकरी करत आहे. १०० हून अधिक मुले देशातील विविध भागात उच्च पदावर कार्यरत आहे.मध्य प्रदेश सरकारच्या दाव्यानुसार पडियाल गावाचा साक्षरता दर 90 टक्क्यांहून अधिक आहे.
दुर्गम आदिवासी बहुल असलेल्या या गावात जवळपास सर्वजण साक्षर आहेत. देश स्वातंत्र्य झाला तेव्हापासूनच गावातील तरुणांनी स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळवण्यास सुरुवात केली. पडियाल या गावाची लोकसंख्या सुमारे ५,५५० आहे. गावातील तरुण हे देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहे.२०२४ मध्ये १०० तरुण- तरुणी प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे
पडियालमधील प्रत्येक मुलं हे अधिकारी होण्याचे स्वप्न पाहतात. तर गावातील अनेक मुले ही परदेशात स्वतः चा व्यवसाय करत आहे. या गावातील मुले ही आयपीएस, आयएएस, डॉक्टर, इंजिनियर, वन अधिकारी, वकील आणि न्यायाधीश आहेत. मध्य प्रदेशमधील या गावाने सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे.