चाललंय तरी काय ? विश्वास नांगरे पाटील यांच्या चेहऱ्याचा वापर, सेवानिवृत्त अधिकाऱ्याला ७८ लाखांचा गंडा
चाललंय तरी काय ? विश्वास नांगरे पाटील यांच्या चेहऱ्याचा वापर, सेवानिवृत्त अधिकाऱ्याला ७८ लाखांचा गंडा
img
दैनिक भ्रमर
AI चा वापर सध्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचे जसे फायदे आहे तसेच तोटेही. छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली ही घटना धक्कादायक आहे. आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या एआय चेहऱ्याआडून एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला लुटल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. दहशतवाद्यांच्या खात्यावरून तुमच्या बँक खात्यात २० लाख जमा झाल्याचा बनाव रचत सेवानिवृत्त अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी ६ दिवसांत तब्बल ७८ लाख ६० हजारांना लुटले. यादरम्यान आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने व्हिडीओ कॉल करून विश्वास ठेवण्यासाठी भाग पाडले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येता सेवानिवृत्त अधिकाऱ्याने थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात ९ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिस सध्या तपास करत आहे. या घटनेमुळे संभाजीनगरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अशाप्रकारचे फेक कॉल येत असतील तर नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक झालेले ७७ वर्षीय पोलिस अधिकारी हे विभागीय आयुक्तालयातून सेवानिवृत्त झाले आहेत. २ जुलै २०२५ रोजी त्यांना पोलिसांचा गणवेश घातलेल्या व्यक्तीने व्हिडीओ कॉल केला. संजय पिसे असे नाव असून आपण नांगरे पाटील यांचा सहकारी असल्याची बतावणी केली. सुरूवातीला त्यांना हा फोन फेक असल्याचे लक्षात आले नाही.

फोन केलेल्या व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याला सांगितले की, तुमच्या पत्नीच्या बँक खात्यात २ कोटींचा बेहिशेबी व्यवहार झाला आहे. त्याचा संबंध दहशतवादी अब्दुल सलाम याच्यासोबत निष्पन्न झाला असून त्याच्याकडून तुम्हाला २० लाख रुपये आल्याने एनआयएकडून तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेची थाप मारली. तक्रारदार घाबरून गेले. फोन करणाऱ्याने थेट आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांच्याशी सल्लामसलत करण्याचा सल्ला दिला होता.

इतर बातम्या
Join Whatsapp Group