बाई, काय प्रकार...  मॅट्रिमोनियल साईटवर डॉक्टर बनून केलं इम्प्रेस, अन पहिल्याच भेटीत केलं असं की...
बाई, काय प्रकार... मॅट्रिमोनियल साईटवर डॉक्टर बनून केलं इम्प्रेस, अन पहिल्याच भेटीत केलं असं की...
img
वैष्णवी सांगळे
मॅट्रिमोनियल साईटवर अनेकांची फसवणूक झाली आहे. मुलगी असल्याचे भासवत अनेकदा मुलांना लाखो रुपयांचा गंडा घातला जातो तर कधी कधी आपला खरी ओळख लपवली जाते. ज्यामध्ये आपले नाव , राहण्याचे ठिकाण , आपण करत असलेला व्यवसाय याचा समावेश असतो. बऱ्याचदा मुलगा श्रीमंत असल्याचे सर्व काही सेटल असल्याचे दाखवतो आणि मुलीला आणि मुलीच्या कुटुंबाला फसवतो.

मॅट्रिमोनियल साईटवरील अशाच एका फसवणुकीची बाब समोर आली आहे. डॉक्टर असल्याचे सांगून एका तरुणाने तरुणीशी मॅट्रिमोनियल साईटवर मैत्री केली. त्याने तिला एका रेस्टॉरंटमध्ये भेटायला बोलावले. भेटीनंतर एका व्यक्तीला भेटण्याच्या बहाण्याने तो तरुणीची स्कूटी घेऊन पसार झाला. त्या स्कूटीमध्ये तरुणीचे दागिने आणि पर्स होती. 

मिळालेल्या माहितीनुसार,  शाहगंज येथील दौरेठा भागात राहणाऱ्या एका तरुणीने लग्नासाठी 'शादी डॉट कॉम' वेबसाइटवर प्रोफाईल तयार केले होते. तिथे डॉ. शिवकुमार शर्मा नावाच्या प्रोफाईलशी मॅच झाल्यानंतर दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. त्यानंतर, कथित डॉक्टर शिवकुमारने तिला दिल्ली हायवेच्या सर्व्हिस रोडवरील एसआरके मॉलमध्ये असलेल्या 'बर्गर किंग' रेस्टॉरंटमध्ये भेटायला बोलावले. काही वेळ गप्पा मारल्यानंतर शिवकुमारने त्याला आपल्या मित्राला आणि वहिनीला भेटायला जायचे असल्याचे सांगितले.

तरुणी त्याच्यासोबत स्वतःच्या स्कूटीवर बसून निघाली. काही अंतर गेल्यावर त्याने आपला मित्र एसआरके मॉलमध्ये पोहोचल्याचे सांगून स्कूटी परत वळवली. मॉलमध्ये पोहोचल्यावर तरुणी पार्किंगची पावती घेण्यासाठी खाली उतरली. इतक्यात आरोपी स्कूटी घेऊन पळून गेला. स्कूटीच्या डिक्कीत ठेवलेल्या पर्समध्ये तिचे दागिने आणि रोकड होती. न्यू आग्रा पोलीस निरीक्षकांनी सांगितले की, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला जात आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group